मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असणाऱ्या आंदोलनातील मराठा आंदोलकांना संपूर्ण राज्यभरातून रसद पुरवली जात आहे.कोल्हापूरातूनही मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांना खाण्याच्या वस्तू पाठवण्यात येत आहेत..मुंबईत या आंदोलनाच्या सुरुवातीला मराठा समाजाची कोंडी करण्यासाठी आझाद मैदान परिसरातील खाण्याची दुकाने बंद करण्यात आली होती.पाण्याची सुद्धा वाणवा झाली होती.त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला..त्यामुळे मराठा बांधवांसाठी राज्यभरातून रसद पाठविण्यास सुरुवात झाली..कोल्हापूरातून देखील सकल मराठा समाजाच्या वतीने टेम्पो भरून फरसाण , बिस्कीटं ,सफरचंद , लाढू ,पाण्याच्या बाटल्या पासून साखर , तांदूळ मुंबईला पाठविण्यात आलायं.दरम्यान सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये..त्यामुळे जोपर्यंत आंदोलन सुरू राहणार तोपर्यंत एकाही मराठा बांधवांना खाण्यासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचा निर्धारही यावेळी सकल मराठा समाजाने केलायं.