Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: “…त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही”; आंदोलनावर जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

मनोज जरांगे यांनी अतिरेक करणाऱ्या आंदोलकांचा चांगलाच समाचार घेतला. गोष्टी संयमाने घ्या नाहीतर तुम्ही आमच्यातले नाही असं समजलं जाईल. याचबरोबर सरकारवर देखील त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 01, 2025 | 05:30 PM
Maratha Reservation: “…त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही”; आंदोलनावर जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
Follow Us
Follow Us:

मुंबई आणि उपनगरात मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणाक धुमाकूळ घातला आहे. कुठे वाहतूक कोंडी, कुठे नाका बंदी तर कुठे रेल्वे थांबवल्याने प्रवाशांचा होणारा खोळंबा. आंदोलनाचा आज चौैथा दिवस असून सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलनातील काही जणांनी अतिरेक करत उभ्या असलेल्या लोकलमधील मोटारमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशीराने धावत असून दादर, कुर्ला आणि परळ स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात ठीय्या मांडत आंदोलकांनी रेल्वे थांबवली. तसंच रेल्वे स्थानक परिसरात कबड्डी आणि खोखो खेळत प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. आंदोलन करताना रेल्वे स्थानाकात कोणत्याही प्रकारे प्रवाशांचा खोळंबा होईल अशा प्रकारे वागणूक करु नका, रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ घालू नका असं मनोज जरांगेंंच्या निर्देशाचे तीन तेरा करत जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.

Maratha Reservation : “लढा उभारला चांगली गोष्ट पण राज ठाकरे यांच्यावर बोलण्या इतकं…” मनसे सचिवांचा जरांगेंना इशारा

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.याचपार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी अतिरेक करणाऱ्या आंदोलकांचा चांगलाच समाचार घेतला. गोष्टी संयमाने घ्या नाहीतर तुम्ही आमच्यातले नाही असं समजलं जाईल.

काय म्हणाले जरांगे पाटील ?

आंदोलनाच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर जरांगे पाटील चांगलेच भडकले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेले चार वर्ष आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला मुंबईत यायची हौैस नाही. पोरं हुल्लडबाजी करतायत ते दिसतं पण सरकार गेली कित्येक दिवस हुल्लडबाजी करत आहेत ते दिसत नाही का ? या सरकारला आम्ही 2 वर्षांचा वेळ दिला मात्र हाती निराशाच आली. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्य़ा मान्य होत नाही तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.

Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव ?

 

Web Title: Maratha reservation jarange patil furious at the rowdy protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
2

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.