Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाचा मुंबईत उद्रेक, बेस्ट बसमध्ये प्रवाशाला मारहाण, काचेची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील सांताक्रूझ आगाराच्या बेस्ट बसमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली. काय घडले नेमके? वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 01, 2025 | 06:46 PM
मराठा आरक्षणाचा मुंबईत उद्रेक, बेस्ट बसमध्ये प्रवाशाला मारहाण, काचेची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:
  • मराठा आरक्षणाचा मुंबईत उद्रेक
  • बेस्ट बसमध्ये प्रवाशाला मारहाण
  • काचेची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Maratha Protest: मुंबईत मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवरही दिसू लागला आहे. मुंबईतील सांताक्रूझ आगारातून सुटणाऱ्या एका बेस्ट बसमध्ये (क्रमांक ७८६७) रविवारी रात्री काही आंदोलक आणि एका प्रवाशात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संतप्त आंदोलकांनी प्रवाशाला बसमध्येच मारहाण केली आणि बसची एक काचही फोडली. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

ही घटना जुहू बस स्थानकाजवळ घडली. रविवार, रात्री ७:१५ वाजता बस जुहू स्थानकावरून जात असताना काही मराठा आंदोलक आणि बसमधील एका प्रवाशात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आंदोलकांनी त्या प्रवाशाला बसमध्येच पाडून मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. याव्यतिरिक्त, आंदोलकांनी बसच्या उजव्या बाजूची तिसरी खिडकीची काचही फोडली.

#WATCH | #Mumbai: Maratha Protesters Allegedly As*au*t Passenger, Vandalise BEST Bus At Juhu Bus Station; Probe Underway

Reported by: @Yourskamalk#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAndolan #bestbus pic.twitter.com/wNbIStjXJZ

— Free Press Journal (@fpjindia) September 1, 2025


बसमधील गोंधळ ऐकून बस चालक आणि वाहक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ शांत होत नव्हता. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाइन १०० वर कॉल करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दोन्ही बाजूचे लोक तिथून निघून गेले होते.

हंगामा शांत झाल्यावर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पाठवण्यात आले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा: Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

आम्ही मुंबई सोडणार नाही- जरांगे पाटील

आंदोलनाच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर जरांगे पाटील चांगलेच भडकले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेले चार वर्ष आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला मुंबईत यायची हौैस नाही. पोरं हुल्लडबाजी करतायत ते दिसतं पण सरकार गेली कित्येक दिवस हुल्लडबाजी करत आहेत ते दिसत नाही का ? या सरकारला आम्ही 2 वर्षांचा वेळ दिला मात्र हाती निराशाच आली. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्य़ा मान्य होत नाही तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.

हायकोर्टाने आंदोलकांना फटकारले

मुंबईत सुरू असलेले आंदोलन हाताबाहेर गेले आहे. पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आलात. पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये. तुम्ही आंदोलनासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारणा केली आहे. 5 हजारांपेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांनी परत जावे असे पत्रक तुम्ही काढणार का? असा सवाल देखील हायकोर्टाने विचारला आहे.

Web Title: Maratha reservation agitation in mumbai chaos in best bus passenger beaten up glass broken video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • best bus
  • Manoj Jarang patil
  • Maratha Reservation
  • Mumbai

संबंधित बातम्या

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक
1

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो
2

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange Patil Live: हायकोर्टाच्या निर्देशांवर जरांगे पाटलांचे भाष्य; म्हणाले, “मेलो तरी चालेल, पण…”
3

Manoj Jarange Patil Live: हायकोर्टाच्या निर्देशांवर जरांगे पाटलांचे भाष्य; म्हणाले, “मेलो तरी चालेल, पण…”

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ
4

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.