भाईंदर (पश्चिम) येथील उत्तनमधील डम्पिंग ग्राउंड बुधवारी रात्रीपासून पेटले असून, या भीषण आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रात्रीपासून अथक प्रयत्न करत असले तरीही, ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.हे डम्पिंग ग्राउंड गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे. दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या आणि सततचा धूर यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याची मागणी केली आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.आज आगीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी मनपा आयुक्त राधाविनोद शर्मा यांची भेट घेतली. त्यांनी डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासांची सविस्तर माहिती देत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल.