Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander News : उत्तनचा विकास आराखडा जारी ; नागरिकांसाठी 30 दिवसांची हरकतीची संधी

मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून उत्तन परिसराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना या आराखड्यावरील हरकती (आक्षेप) व सूचना नोंदवण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 25, 2025 | 03:35 PM
Mira Bhayander News : उत्तनचा विकास आराखडा जारी ; नागरिकांसाठी 30 दिवसांची हरकतीची संधी
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर / विजय काते : मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून उत्तन परिसराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना या आराखड्यावरील हरकती (आक्षेप) व सूचना नोंदवण्यासाठी एक महिन्याचा, म्हणजेच 30 दिवसांचा कालावधी दिला आहे.

भाईंदर पश्चिम परिसराला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असून, या परिसराचा पर्यटनीय आणि सामाजिक विकास व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने 2016 ते 2021 या प्रादेशिक योजनेअंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील सहा गावांचा (उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी, मोर्वा) तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दोन गावांचा (मनोरी, गोराई) समावेश करून मनोरंजन व पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले होते.

मात्र अपेक्षेप्रमाणे येथे विकासाचे काम होऊ शकले नाही, आणि काही ठिकाणीच अपेक्षित परिणाम दिसले. परिणामी या भागात राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागले. या परिस्थितीचा विचार करून, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या योजनेची मुदत संपल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेने मागणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या हद्दीतील गावे महापालिकेत पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, ठाणे सहाय्यक नगररचना विभागाकडून मिरा-भाईंदर महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र उत्तन भागाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने 14मार्च 2024 रोजी सुरू केले आणि ‘टीयुएमसी’ या एजन्सीची नेमणूक केली. त्यानुसार 24सप्टेंबर 2025 रोजी हा आराखडा अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक संपन्न

प्रत अवलोकनासाठी उपलब्ध
उत्तन भागातील सहा गावांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आराखड्याची प्रत भाईंदर पश्चिम येथील महापालिका मुख्यालय आणि मिरा रोडच्या नगररचना कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मानुसार, नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी पुढील 30 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून दिला जात आहे.

आराखड्यावर शासन मान्यतेची प्रतीक्षा
मिरा-भाईंदर महापालिकेचा सुधारित प्रारूप विकास आराखडा वर्षभरापूर्वी तयार झाला असून सहाय्यक संचालक ठाणे नगररचना विभागाकडून त्याची रूपरेषा आखण्यात आली होती. मात्र हा आराखडा प्रसिद्ध होताच अनेक लोकप्रतिनिधी, विकासक व नागरिकांनी त्यावर आक्षेप नोंदवले. या आक्षेपांचा विचार न होऊन शासन दरबारी तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाची अधिकृत मान्यता अद्याप मिळालेली नाही.

“योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा…”, कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Web Title: Mira bhayander news uttans development plan released 30 day opportunity for citizens to object

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन
1

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा
2

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.