नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते या मतावर ठाम राहतील.तायवाडे म्हणाले की, वंशावळीनुसार नातेवाईकांकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना प्रमाणपत्र मिळेल हा प्रचलित नियम आहे. चुकीचे प्रमाणपत्र काढल्यास त्याला शिक्षा आहे आणि कायद्यात तरतूद आहे. 2004 च्या कायद्यात नातेवाईकांची स्पष्ट परिभाषा केली आहे आणि पितृसत्ताक पद्धतीनेच संबंध जोडले जातात.त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या AK47 संदर्भातील वक्तव्यावर टीका करत सांगितले की, राजकीय नेत्यांनी दोन समाजामध्ये दुरी निर्माण होईल असे वक्तव्य करू नये. 10 ऑक्टोबरला नागपूरात होणाऱ्या मोर्चाच्या मागणीशी ते सहमत नसल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ या मोर्चात सहभागी होणार नसल्याची घोषणा केली.