नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित ठिकाणी जावे.पूरस्थितीत कुणीही नदीकाठी जाऊ नये तसंच सेल्फी काढण्यासाठी नदीकाठी जाणे टाळा असं सांगण्यात आलेलं आहे.