Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Bharat Express: आता नांदेड ते मुंबई प्रवास 9 तासांत पार! एक्सप्रेसचे थांबे कुठे? जाणून घ्या…

बहूप्रतिक्षेत असलेल्या नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2025 | 02:56 PM
आता नांदेड ते मुंबई प्रवास 9 तासांत पार! (फोटो सौजन्य-X)

आता नांदेड ते मुंबई प्रवास 9 तासांत पार! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Vande Bharat Express News in Marathi: मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखी आरामदायी सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे.

“… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘ वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

नांदेड येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

काय आहेत वैशिष्ट्ये?

· मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.

· नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी.

· महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा.

· हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

· नियमित प्रवास करणारे प्रवासी, भाविक, अधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.

· पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

Web Title: Mumbai nanded vande bharat will start from 26 aug inauguaration by cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nanded
  • vande bharat express

संबंधित बातम्या

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
1

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ
2

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?
3

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?

“देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी…खरे हिंदुत्ववादी असाल तर…; खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात
4

“देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी…खरे हिंदुत्ववादी असाल तर…; खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.