चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली. या योजनेत ठेवीला ९% टक्के व्याजदर ठेवण्यात आला होता. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ९ दिवसांत या योजनेत तब्बल ३ कोटी ६१ लाख रुपये संकलित झाले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात एकूण ठेवीत तब्बल १५ कोटी ४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. तर ठेवीदारांना दिपावलीकरिता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली असून ६ ते ११ महिने मुदत ठेवींवर उत्तम ९.५५% व्याजदर दिला जाणार असून या ठेव योजनेत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी केले आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. संस्थेची सभासद संख्या १ लाख ४५ हजार१०१, भाग भांडवल ७८ कोटी ७९ लाख रुपये, स्वनिधी १७७ कोटी ५७ लाख, ठेवी १ हजार १८२ कोटी, कर्जे १ हजार १७ कोटी, पैकी प्लेज लोन ४०२ कोटी ९८ लाख, सोने कर्ज ३४८ कोटी ३० लाख, गुंतवणुका ३०० कोटी ७६ लाख रुपये, मालमत्ता ४० कोटी ५१ लाख, नफा मार्च अखेर २१ कोटी २ लाख रुपये, एकूण शाखा ५० असून या शाखांच्या माध्यमातून हा आर्थिक कारभार सुरू आहे.
चिपळूण नागरीने सुरुवातीपासून आर्थिक पारदर्शकतेला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. कोरोना असो, महापूर असो, तिवरे फुटीची दुर्घटना असो या संकटमयी काळात चिपळूण नागरी पतसंस्था लोकांच्या मदतीला धावून गेली आहे. विशेष म्हणजे कोरोना कालखंडात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देत महाराष्ट्रात इतका निधी देणारी वित्तीय संस्थांमध्ये चिपळूण नागरी अग्रेसर राहिल्याचे दिसून आले.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या राज्यातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने” आपली माणसे ! आपली संस्था या ब्रिदवाक्या प्रमाणे नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. यानुसार इथला तरुण, शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला पाहिजे, ही भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची राहिली आहे. यातून स्वयंरोजगार कर्ज, शेतीपूरक कर्ज, महिलांना स्वावलंबी कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून या सर्वांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात संस्थेने मोठा हातभार लावला आहे. विशेष म्हणजे कर्ज योजनेच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय उभे राहिले आहेत, ही मोठी सकारात्मक बाब ठरली आहे.
याचबरोबर सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना चिपळूण नागरीने सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडात श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव,उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव व धनसंचय ठेव, राष्ट्र अमृतमहोत्सव ठेव, संकल्प ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत.
यामध्ये आवर्त ठेव योजनेंतर्गत ४३ हजार खातेदारांकडून दरमहा ६ कोटी ३० लाखांच्या ठेवी संकलित होत आहेत. हे खातेदार १०० रुपयांपासून गुंतवणूक करीत आहेत. तसेच महिलांसाठी सुकन्या ठेव , गृहलक्ष्मी ठेव योजना तसेच सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित आहेत.
नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजना घटस्थापनेच्या दिवशी सुरु करण्यात आली. या योजनेचा कालावधी १५ दिवसांचा ठेवण्यात आला होता. यामध्ये या ठेवींवर ९% व्याज दर देण्यात आला. ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ९ दिवसांत या योजनेत ३ कोटी ६१ लाख रुपये संकलित झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी दिली. तर आता दीपावली सणानिमित्त ठेविदारांना सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आले आहे.
यामध्ये ६ ते ११ महिने मुदत ठेवीवर ९.५५ टक्के इतका व्याज दर ठेवण्यात आला असून या ठेव योजनेत सहभागी होण्याबरोबरच स्वयंरोजगार कर्ज, शेतीपूरक कर्ज, महिलांना स्वावलंबी कर्ज योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.