पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव मतदानासाठी’ या संकल्पनेवर आधारित महिलांची भव्य मॅरेथॉन वडाळे तलाव, पनवेल येथे उत्साहात पार पडली. लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा तसेच मतदानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.