Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?

नवी मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नवी मुंबई मुख्यालयात गायकवाड यांच्या केबिनमध्ये त्यांना अटक करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 07:26 PM
Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?
Follow Us
Follow Us:
  • पालिकेच्या उपायुक्तांना रंगेहाथ पडकलं
  • 42 हजारांची लाच घेताना उपआयुक्त कैलास गायकवाड यांना अटक
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नवी मुंबई मुख्यालयात गायकवाड यांच्या केबिनमध्ये त्यांना अटक करण्यात आली. या घटनेने पालिका वर्तुळात कर्मचारी ते अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर गायकवाड हे गझलकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे साहित्यिक विश्वात देखील काहकबल उडाली आहे. नवी मुंबई पालिकेचा अतिक्रमण विभाग इतिहासातील अनेक घोटाळ्यांमुळे अतिक्रमण विभाग कुप्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाचा अधिकारी रंगेहाथ पकडला गेल्याने पालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण विभागाचे कंट्री घेणारे दशरथ सुरवसे या कंत्राटदाराकडून ही लाच गायकवाड यांनी मागितली होती. ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कामे सुरवसे यांनी केली होती. कंत्राटदाराचे या कामाचे बिल पालिकेत अडकले होते. ते बिल मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला असता, संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी, फाईलवर सही करण्यासाठीअतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड यांनी 42 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुरवसे यांनी केला. आधीच बिल मिळत नसल्याने व लाचेची मागणी केल्याने त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नवी मुंबई विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. त्यानुसार, महापालिकेच्या गायकवाड यांच्या केबिन बाहेर सापळा रचण्यात आला. गायकवाड यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर महापालिकेतील खालपासून वरपर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचार अधोरेखित झाला आहे. तक्रारदार दशरथ सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभराच्या कामाचे एकूण दीड कोटींचे बिल थकीत होते. त्यापैकी 21 लाखांचे बिल घेण्यासाठी म्हणून सुरवसे गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यापैकी 21लाखांचे 2 टक्के रक्कम लाच स्वरूपात मागीतल्याची माहिती सुरवसे यांनी दिले. या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडूनही या घटनेची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गायकवाड हे पेशाने डॉक्टर होते. तसेच ते साहित्यिक्त देखील होते. अशा अधिकाऱ्यास अटक झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

 

Web Title: Pali deputy commissioner caught red handed deputy commissioner kailash gaikwad arrested while taking a bribe of rs 42000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • corruption news
  • crime news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
2

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
3

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
4

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.