वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ४९० स्टॉल्समध्ये खरेदी, चव आणि विविध उत्पादनांचा अनुभव एकाच ठिकाणी मिळत असल्याने हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनात पारंपरिक हस्तकला, धुपबत्त्या, नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने तसेच मातीपासून बनवलेल्या कलाकृतींना विशेष मागणी आहे. विविध जिल्ह्यांतील उद्योजकांनी सादर केलेल्या उत्पादनांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योजकांना मोठी संधी मिळाली असून ‘स्थानिक ते जागतिक’ असा अनुभव नागरिकांना मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.