भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून वाशी येथे 50 कोटींच्या गुंतवणुकीने ‘सहकार सुरक्षा’ या नावाने अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर (C-SOC) स्थापन करण्यात आले आहे. सायबर हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सेंटर छोट्या-मोठ्या सहकारी बँकांना विनानफा तत्त्वावर सेवा देईल. उद्घाटन 13 जून 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.