अंधेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सीबीआयचे अधिकारी यांच्या नावाने पालघरच्या बोईसर येथील एका 71 वर्षीय वयोवृद्धाला डिजिटल अरेस्ट दाखवून तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या आठ जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आल आहे . पालघरच्या बोईसर येथील एलआयसी मधील एका निवृत्त अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल मार्फत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून तब्बल तीन कोटींपेक्षा अधिक रुपये या टोळीने उकळले होते . यानंतर या सगळ्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली जवळपास दीड हजार सिम कार्ड , फिर्यादीच्या अकाउंट मधून विविध अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले पैसे याच्या आधारावर पालघर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून या गुन्ह्यात सामील असलेल्या आणखीन काही आरोपींचा शोध सध्या महाराष्ट्र सायबर पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने पालघर पोलिसांकडून सुरू आहे . अशा पद्धतीने फेक व्हिडिओ कॉल आणि कॉल आल्यास घाबरून न जाता लगेचच पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी असं आवाहन यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केला आहे .