संत तुकाराम महाराजांच्या पावन चरणांनी स्पर्श झालेल्या देहूनगरीत जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी, याच भावनेतून खासदार नीलेश लंके यांनी देहू नगरीत स्वच्छता आणि वृक्षारोपणाची भव्य मोहीम राबवत सामाजिक लढ्याला नवे बळ दिलंय. आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत देहूतील प्रमुख रस्ते, घाट परिसर,सार्वजनिक ठिकाणे तसेच नदीकाठाची सखोल स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम केवळ कचरा उचलण्यापुरती मर्यादित राहिली नाही,तर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक देहू घडवण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न ठरला असून विविध ठिकाणी वृक्षारोपण करत हरित देहूचा संदेशही जनतेपर्यंत या निमित्ताने पोहोचवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत ‘आपला मावळा’ संघटनेचे शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. देहूच्या सन्मानासाठी उभारलेला हा सामाजिक लढा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वच्छ देहू, हरित देहू आणि जबाबदार नागरिकत्वाची हीच खरी सुरुवात खासदार निलेश लंके यांनी देहूकरांना दिलाय तसेच यावेळी राजकीय भाष्य करण्याचे खासदार लंके यांनी टाळले.