ईव्हीएमवर आक्षेप घेण्यापेक्षा, त्या विरोधात रडगाण्यापेक्षा तुमचा पराभव कसा झाला याचा आत्मापरीक्षण आधी करा. लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएम चांगले आणि विरोधात लागले तर ईव्हीएम वाईट असे चालत नाही असे म्हणत नेवासा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विकास कामांवर देखील भाष्य करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांना डिवचले.