रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली परिवर्तन पदयात्रा आज काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पूर्ण झाली. या ९९ किमीच्या पायी प्रवासादरम्यान बाळ माने यांनी रत्नागिरीतील रस्ते, ड्रेनेज, क्रीडांगण आणि उद्यानांच्या दयनीय स्थितीवर भाष्य केले. “AC गाडीतून बाहेर पडा आणि पायी फिरा, मगच जनतेच्या समस्या दिसतील,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला.