रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे फतेगड किल्ल्याची दरड कोसळली, गडावरील मानवी लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसानंतर गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळला , दुर्घटनेत दोन घरांना थेट धोका निर्माण झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून कुटुंबांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत. फतेगड परिसर दरवर्षी दरडीच्या धोक्याने हादरतो आहे, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. स्थानिकांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. फतेगड हा ऐतिहासिक किल्ला असला तरी नागरिकांचेही संरक्षण तितकेच महत्त्वाचे आहे.