सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत? हा प्रश्न पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का? इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे, असे सांगत आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले. उद्योजकांना जवळपास ५१ टक्के दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन आदेश मागे घ्यावा, असे निवेदनात म्हंटले गेले आहे.