सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये माजी मंत्री तथा आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 22 जागांवर यश मिळाले आहे. तर महापौर म्हणून आनंदराव मलगुंडे हे निवडून आले आहेत. शिवाय आष्टा नगरपरिषदेतही तब्बल 24 जागावर यश संपादन करून महापौर पदावर सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान ईश्वरपूर व आष्टा शहराला पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्यासाठी आमच्या पक्षातील विजयी उमेदवारांबरोबरच हरलेले उमेदवार आणि विरोधक यांना विश्वासात घेऊन शहराचा विकास करू असा विश्वास जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरपूर मध्ये येऊन जी जी आश्वासने दिली होती ती त्यांनी आता पूर्ण करावी असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला