आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ आहे. विज्ञानाची गोडी कायम जपा, प्रश्न विचारा, प्रयोग करा आणि नवनवीन शोध दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन म्हणजे केवळ प्रयोगांची मांडणी नसून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, जिज्ञासेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनाशी निगडित समस्या, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, आरोग्य, तंत्रज्ञान, शेती व नवकल्पना यांसारख्या विषयांवर आधारित प्रयोग सादर केले असून, त्यातून त्यांची संशोधनवृत्ती व समाजाप्रतीची जबाबदारी दिसून येते. अशा उपक्रमांतून भविष्यातील शास्त्रज्ञ, संशोधक व अभियंते घडण्याची पायाभरणी होते.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.