शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाही शक्तीपीठ महामार्ग कामास मंजुरी देण्यात आली आहे.कोणाचेतरी स्वप्न पुर्ण करण्याकरिता सरकार शक्तीपीठचा घाट घालत असेल तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. शक्तिपीठ महामार्गाबाबत विरोध होत असताना शासनाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील शेटफळे गावामध्ये जमिनी मोजण्यासाठी प्रांतांसह शासकीय अधिकारी शेतावर आले असता शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. परंतु शेतकऱ्यांचा विरोध डावलूनही अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जमीन मोजलीय.शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. म्हणुन आमची लढाई आमच्या गावात आणी शेतात राहील. . त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे. त्यासाठी येत्या एक जुलै रोजी नागपूर रत्नागिरी महामार्गावरील अंकलीमध्ये महामार्ग बाधित शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच शेतकरी आणि नागरिकांना घेऊन चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आज सांगली मध्ये झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.