सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासनाला हाताशी धरून भाजपाने 35 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्या विरोधात नुकतेच आंदोलन ही करण्यात आले. आज या बाबत महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही आपली भूमिका मांडली असून, काँग्रेसने अथवा विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी भाजपाकडून चार्जिंग स्टेशनच्या जागेबाबत 35 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध करावे. ते सिद्ध झाल्यास मी महापौर पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे परंतु दोन दिवसात हा आरोप सिद्ध न झाल्यास विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची माफी मागावी. अशी प्रतिक्रिया महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेनंतर नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहे.