वार्ड क्रमांक 8 मधील विद्यानगर परिसरातील एका खुल्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होते. ते अतिक्रमण सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल औंधकर आणि अजित दुधाळ रुपेश मोकाशी यांच्या पाठपुराव्याने आज महानगरपालिका प्रशासनाने हातोडा चालवत तोडले. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे अतिक्रमण करण्यात आल्याचे आणि ते विकण्याचाही घाट घालण्यात आला होता. परंतु स्वप्निल औंधकर, अजित दुधाळ आणि रुपेश मोकाशी यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सजगतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला आहे.दरम्यान महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनीही अशा खुल्या भूखंडावर डोळा ठेवून त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी. सर्वे नंबर 41/ 21 फाईल सापडत नसल्याने नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोमवार पर्यंतचा पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, ही फाईल सापडत नाही की लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे दिली जात नाही हे पाहणे गरजेचे असून, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या केबिन बाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
.