ग्रामीण भागात यात्रा जत्रा आली की तमाशा आणि नाटके आलीच हीच महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख आहे.. याच तमाशाच्या रंगमंचावर वास्तव दाखवणाऱ्या पडद्यांचे अधिक महत्त्व असते.. या पडद्यांची जागा डिजिटल युगामध्ये फ्लेक्स प्रिंटिंग सध्या घेतले आहे.. मात्र साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात असणाऱ्या श्रीनिवास शंकर कांबळे यांनी लोप पावत चाललेली कला जोपासण्याचे काम गेले अनेक वर्ष ते करत आहेत.. काळू बाळू, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे यांसारख्या मोठ्या तमाशा मंडळाचे वास्तव दाखवणारे पडदे ते दरवर्षी बनवून देत असतात. पैसा मिळवणे हे माध्यम डोळ्यासमोर न ठेवता कला जोपासण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे देखील त्यांनी बोलताना सांगितलं आहे.. सध्याच्या काळात फ्लेक्स कमी दरात मिळतात मात्र या आधुनिक काळात मोठ-मोठे तमाशा मंडळ वास्तव दाखवणारे पडदे तयार करत असतात. पुढील काळातील मुलांना वास्तव दाखवणारे पडदे हे फक्त फोटोमध्ये किंवा चित्रांमध्ये पाहायला मिळतील, ही कला लोप पावत चालली आहे.. त्यामुळे नवीन पिढीला ही कला शिकवण्याचा प्रयत्न देखील श्रीनिवास कांबळे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.