सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा जल्लोष सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटीवर साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, जिलेबीचे वाटप आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात शिवभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी ही ऐतिहासिक घटना जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली. गुरु राणे, सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणा उत्सव समिती अध्यक्ष, यांनी सांगितले की महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाल्यामुळे संपूर्ण देशासाठी ही गौरवाची बाब आहे.