पंढरपूर जवळ पखालपूर येथे गणपतीचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. परिसरातील अनेक लोकांची या गणपतीवर श्रद्धा आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला या मंदिराची माहिती घेताना अनेक रंजक बाबी समोर आले असून हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आल्याची आख्यायिका येथील पुजारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितली आहे. पंढरपूर येथील स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तात्यासाहेब डिगरे यांच्या घराण्याचे हे कुलदैवत असून गणेश भक्ताच्या हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आला आहे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर असून दक्षिणेतून उत्तरेला तीर्थयात्रा जाणाऱ्या लोकांची जकात वसूल करण्याची देखील ही जागा असल्याचे सांगितले जाते. जकातीचे रांजण तसेच शिलालेख येथे आढळून येतात