मुंबई: नवभारत वृत्त समूहाच्या ‘नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ चे आयोजन मुंबईतील विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे करण्यात आले होते. कला, मनोरंजन आणि समाजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता, विनोदी कलाकार सायरस ब्रोचा, गायिका पलक मुच्छाल आणि संगीतकार मिथून यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. खासदार अनुराग ठाकूर, संजय दिना पाटील आणि नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी यांच्या हस्ते या कलाकारांना आणि विविध क्षेत्रांतील इन्फ्लुएन्सर्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.