Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

Durge Durghat: नवरात्रीच्या काळात अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तिभावाने म्हटली जाणारी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी 17 व्या शतकात रचल्याचे सांगितले जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 11:55 AM
Durge Durghat Bhari Aarti Meaning (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Durge Durghat Bhari Aarti Meaning (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आरतीचे रचनाकार
  • रचनेमागील कथा
  • पहिल्या ओळींचा अर्थ
आपल्याकडे नवरात्रीच्या सणाला सर्वात मान मोठा दिला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. आज देवीला पांढऱ्या रंगाची रेशमी साडी नेसवली जाते. देवीच्या दुसऱ्या माळेला माता ब्रह्मचरिणी देवीची पूजा करतात. त्याचे महत्त्व तपस्या, संयम आणि भक्तीशी जोडलेले आहे. दरम्यान अनेकांच्या घरी तसेच मंडळामध्ये ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरतीचा जोर-जोरात आवाज घुमतो. पण या आरतीमागचा नेमका अर्थ काय? किंवा ही आरती कोणी लिहिली त्याबद्दल किती जणांना माहिती चल आज समजून घेऊया…Durge Durghat

ही आरती कोणी लिहिली?

ही आरती समर्थ रामदास यांनी तब्बल 17 व्या शतकामध्ये ही आरती रचली होती. अशी कथा सांगितली जाते की, समर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळेस त्यांना ही आरती सुचली. त्याकाळी अनेक संकटे एकामागोमाग येत होती त्यामुळे सर्व नागरिक घाबरलेले त्यांना थोडी हिम्मत यावी, त्यांच्यात लढण्याचे बळ यावे म्हणून समर्थांनी देवीच्या शक्तीचे वर्णन करत ही आरती रचली. देवी किती शक्तिशाली आहे तसेच ती आपल्या भक्तांच्या हाकेला कशी धावून येते हे त्यांनी या आरतीतून सांगितले.

आरतीचा सोपा अर्थ काय?

समर्थ रामदासांनी पहिल्या ओळीचा अर्थ खूप खोलवर विचार करत सांगितला आहे. ‘दुर्गे दुर्घट भारी’ म्हणजे हे दुर्गा माते, हे जीवन खूपच कठीण आहे. ‘तुजविण संसारी अनाथ नाथे’ म्हणजे तुझ्याशिवाय या जगात आम्ही अनाथ आहोत. तूच आमची आई आहेस, तूच आमचा आधार आहेस.जेव्हा आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळतो, काहीच मार्ग दिसत नाही, तेव्हा फक्त तूच आम्हाला वाचवू शकतेस, असा त्याचा अर्थ आहे.

या आरतीच्या पुढील ओळीमध्ये रामदास स्वामींनी देवीच्या वेगवेगळ्या रुपाचे वर्णन केले आहे. तिच्या हातात शस्त्र आहेत, गळ्यात मोत्याच्या माळा आहेत, कपाळावर कुंकू आहे. ती दिसायला किती सुंदर आणि त्याचवेळी किती शक्तिशाली आहे हे समर्थांनी सांगितले आहे. तिने महिषासुर नावाच्या मोठ्या राक्षसाला मारले. त्यामुळे सगळ्या देवांना आणि माणसांना तिने सुख दिले. ती संकटातून वाचवणारी आहे.

शेवटच्या कडव्याचा अर्थ

शेवटच्या कडव्यात समर्थ रामदास स्वामी स्वतःला एक लहान लेकरू समजतात आणि देवीला म्हणतात की मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. मला या संसाराच्या मोहातून, भीतीतून बाहेर काढ. मला फक्त तुझ्या पायाची सेवा करू दे, तुझी भक्ती करू दे.एवढी सोपी मागणी ते देवीकडे करतात.

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

म्हणूनच ही आरती आज 300-400 वर्ष झाली तरी लोकांच्या तोंडात आहे. ज्यावेळेस आपण ही आरती म्हणतो तेव्हा फक्त शब्द न म्हणता त्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेत आपली कोणती इच्छा देवीकडे मागायची हे देखील आपल्याला समजते. देवी नक्कीच आपले दुःख दूर करते, अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. या आरतीवर गाणे सुद्धा तयार झाले.

कोणत्या चित्रपटामध्ये ही आरती ..

ही आरती 2005 साली आलेल्या केदार शिंदेंच्या ‘अगं बाई अरेच्चा!’ या चित्रपटामध्ये गाण्यांच्या स्वरुपात आली आहे. या गाण्याला गीत अजय- अतूल यांनी दिले आहे.

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Web Title: Durge durghat bhari aarti meaning composer significance rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • hindu religion
  • Navratri 2026
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले
1

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
2

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना
3

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.