दारूच्या नशेत बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर अजगराने घातला विळखा, क्षणार्धात डाव पलटला उलट अन् ... Video Viral
अजगराला जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये गणले जाते. तो आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो. त्याच्या चपळतेने आणि सामर्त्याने तो क्षणार्धात आपल्या शिकाऱ्याला मृत्यूच्या दारी पोहचवतो. प्राणीच काय तर माणसंही अजगराला पाहताच तेथून पळ काढतात. सध्या अजगराचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे.
सोशल मेडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला पोट धरून हसवतात तर काही आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक अजगर मद्यधुंद अवस्थेत बसलेल्या व्यक्तिभोवती विळखा घालून बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीला माहितीच नाही की त्याच्या पुढ्यात त्याचा मृत्यू येऊन बसला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण हादरले आहेत.
हेदेखील वाचा – धक्कादायक! चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् … Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती व्यक्ती दिसेल जो मद्यधुंद अवस्थेत एका जागी बसलेला आहे. व्यक्ती निवांत बसलेला असतो मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी त्याच्या पुढ्यात एक भलामोठा अजगर विळखा घालून बसलेला असतो. त्याला अजगराबरोबर बसलेले पाहून लोक जोरजोराने ओरडताना दिसत आहे. मात्र मद्यधुंद अवस्थेत त्याला कशाचेही भान राहत नाही, त्याच्या आजूबाजूला काय सुरु आहे, हेदेखील त्याला समजत नाही. या व्हायरल व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ नांदयाल शहरातील आहे. नांदयाल हे आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
A python climbed on a person who was intoxicated by alcohol was saved by the locals
pic.twitter.com/SANrltQWNc— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 15, 2024
हेदेखील वाचा – धक्कादायक! अजगराने केली गाईच्या बछड्याची शिकार, अजगराला झोडपत गावकऱ्यांनी पोटातून बाहेर काढलं पिल्लू, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, दारूच्या नशेत एका व्यक्तीवर चढलेल्या अजगराला स्थानिकांनी वाचवले असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करून यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माउंटन ड्यूच्या नशेत आहे का? डर के आगे जीत है” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ““व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ““व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला”.