तुम्ही सोशल मीडियावर “पट्ट से हेड शॉट” डायलॉग नक्कीच ऐकला असावा. याचा अर्थ आहे, निशाणा डोक्यावर लागणे. सध्या सोशल मेडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याला पाहून तुम्हाला निश्चितच या डायलॉगची आठवण येईल. नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एका महिलेवर रस्त्याने चालताना चक्क पाण्याची टाकी पडल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
वास्तविक, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला तिच्या घरासमोरून घराकडे परत येत आहे, तेव्हा रस्त्यावरून जात असताना तिच्या डोक्यावर पाण्याची मोठी टाकी पडते. हे दृश्य पाहून अनेकांना धडकी भरते आणि ही महिला जिवंत राहिली नसावी असे वाटते मात्र घडले काही भलतेच. ही टाकी प्लॅस्टिकची असून ती पूर्णपणे रिकामी असण्यासोबतच ती वरून आणि खालूनही ओपन आहे, त्यामुळे महिलेला यात कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र टाकी तिच्या अंगावर पडल्याने ती खाली पडते आणि टाकीमध्येच अडकते.
हेदेखील वाचा – धक्कादायक! अजगराने केली गाईच्या बछड्याची शिकार, अजगराला झोडपत गावकऱ्यांनी पोटातून बाहेर काढलं पिल्लू, Video Viral
डोक्यावर पाण्याची टाकी पडल्याचा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर येतो आणि आवाज कशामुळे झाला हे शोधतो. मात्र समोरील दृश्य पाहून तोही अचंबित होतो. यानंतर दोघेही वरच्या दिशेने पाहतात आणि टाकी कुठे पडली हे शोधण्याचा प्रयत्न करतात. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @ashishsharma3865 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओतील घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरेने लिहिले आहे, “एवढं होऊनही ती खात होती…. ती खरी फूडी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “क्षणभर मला वाटले की ती चिरडून मेली आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आंटी भाग्यवान आहे की त्या टाकीत पाणी नव्हते”.