अजगर हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी आहे. तो आपल्या विशाल शरीरासाठी आणि चपळ शिकारीसाठी ओळखला जातो. आजाराची नजर कोणा प्राण्यावर गेली तर त्याचा जीव वाचणे फार कठीण होऊन बसते. अजगर हा एक असा प्राणी आहे जो प्राणीच काय तर माणसांनाही खायला मागे पुढे बघत नाही. त्याच्या या धास्तीमुळेच सर्वजण त्याला घाबरून असतात.
सध्या अजगराचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एका अजगराने निलगाईच्या बछड्याला गिळल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गावकरी या अजगराला पकडून त्याला हलवून त्याने गिळलेल्या गाईच्या बछड्याला अजगराच्या पोटातून बाहेर काढताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण हैराण झाले आहेत.
हेदेखील वाचा – पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हिमाचल प्रदेशमधील हरोली या ठिकाणची आहे. तर घडलं असं की, अजगराने नीलगायीच्या पिल्लाला गिळून टाकलं. मुळात अजगर आपल्या शिकाऱ्याला जिवंतच गिळतो. मग अजगराच्या पोटातील पाचकरसांमुळे तो प्राणी बेशुद्ध पडतो आणि त्याचं शरीर हळूहळू गळू लागतं. मात्र शिकार केल्यानंतर अजगर सुस्तावतो, त्याला जागेवरून हलणे देखील कठीण होऊन बसते. याच गोष्टीचा फायदा घेत गावकऱ्यांनी या सुस्तावलेल्या अजगराला पकडलं आणि हलवत त्याच्या पोटातून निलगायीच्या पिल्लाला बाहेर काढलं. ही सर्व घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात टिपली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
In a recent viral video some locals try to save a Nilgai calf after it was swallowed by a python. What do you think; is it right to interfere like this in natural world. Or they did right thing. pic.twitter.com/Qgxk0MPUq0
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 12, 2024
हेदेखील वाचा – Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ IFS अधिकारी प्रविण कासवान यांनी आपल्या @ParveenKaswan नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक एका नीलगायीच्या बछड्याला अजगराने गिळल्यानंतर वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला काय वाटते; नैसर्गिक जगात अशा प्रकारे हस्तक्षेप करणे योग्य आहे का? किंवा त्यांनी योग्य गोष्ट केली असा प्रश्न विचारला आहे.
अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, प्रत्येकाला आपले अन्न मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नैसर्गिक जगात ढवळाढवळ करणे चुकीचे आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नाही, ते योग्य नाही. अन्नसाखळी नैतिकतेवर चालत नाही.”