विशालकाय अजगराला ओढत काढले बाहेर, क्षणार्धात अजगराने घातला गळ्याभोवती विळखा अन् थरारक घटनेचा Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहू शकता. यातील बरेच व्हिडिओ दररोज व्हायरल देखील होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करतात. यात काही थरारक व्हिडिओ देखील सामील असतात, ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. आता सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एक व्यक्ती चक्क भल्यामोठ्या अजगरासोबत खेळताना दिसून येत आहे.
जगभरात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत. यातील काही प्राणी धोकादायक असतात, जे आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखले जातात. यातीलच एक म्हणजे अजगर. आपल्या भल्यामोठ्या आणि लांबलचक शरीराने तो क्षणार्धात शिकारीवर असा वार करतो की त्याच्या तावडीने निसटणे कठीण होऊन बसते. हा अजगर प्राण्यांनाच काय तर माणसांनाही खायला मागे पुढे पाहत नाही. अशात त्याच्याशी पंगा घेणे फार महागात पडू शकते. असेच काहीसे दृश्य सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडत असल्याचे दिसून येत आहे. इथे एका व्यक्तीने विशालकाय अजगराला पकडताच अजगर आपले शरीर त्याच्या गळ्याभोवती फिरवतो आणि भरगच्च विळखा घालतो. ही सर्व दृश्ये हैराण करणारी आहेत.
हेदेखील वाचा – जमीन खणताच व्यक्तीला मिळाला रहस्यमयी मटका, खोलताच सोन्याच्या नाण्यांसह आतून निघाले दोन भयावह जीव, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीचे नाव माइक असे आहे. त्याला प्राणी फार आवडतात. तो नेहमीच आपल्या अकाउंटवर निरनिराळ्या प्राण्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असतो. सध्या त्याच्या अजगारासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, माइक एका विशालकाय अजगराला एका खोलीतून खेचून बाहेर लढतो. यानंतर तो त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र तितक्यात हा अजगर त्याच्या गळ्याभोवती विळखा घालतो. व्हिडिओतील ही सर्व थरारक दृश्ये पाहून आता युजर्स मात्र फार अचंबित झाले आहेत. पण माइकला प्राण्यांना नियंत्रित करणे माहिती असल्याने त्याला यात काहीही होत नाही.
हेदेखील वाचा – दिवाळीनिमित्त दोन हॉस्टेलमध्ये झाले युद्ध, विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, थरकाप उडवणारी दृश्ये अन् Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करता यावर आपल्या प्रतिक्रया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “युद्धाचा देवता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा साप चावू देखील शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बावळटपणा’.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.