हॉस्टेल एक अशी जागा आहे जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. वास्तविक ही मुलं घरापासून दूर असलेल्या हॉस्टेलमध्ये एकटीच राहायला आली आहेत. पण इथे मिळणारे कुटुंब त्यांना जीवन कसे जगायचे हे शिकवते. मित्रांसोबतच्या मौजमजेपासून ते भांडण आणि अनेक गोड-आंबट आठवणी, घेऊन मुलं त्यांचे हॉस्टेल सोडतात. अनेक वेळा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना सणासुदीत त्यांच्या घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत ते हॉस्टेलमध्येच आपल्या कॉलेज किंवा शाळेतील कुटुंबांसोबत सण साजरे करतात.
तसेच दिवाळीच्या निमित्ताने हॉस्टेलमध्ये राहणारी काही मुले घरी न गेल्याने त्यांना दिवाळी साजरी करण्याचा धोकादायक मार्ग सापडला. ज्यात त्यांनी हॉस्टेल परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्धाला सुरुवात केली. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील धक्कादायक दृश्ये तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाहीत.
हेदेखील वाचा – चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी… धक्कादायक VIdeo Viral
काय आहे व्हिडिओत?
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दोन्ही गटातील मुले आपापल्या वसतिगृहातून एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धात ते हात-पाय बांधून लढत नाहीत, तर दिवाळीत पेटवलेले फटाके त्यांनी शस्त्र म्हणून वापरले आहेत. दोन्ही गटातील विद्यार्थी रॉकेटने एकमेकांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. हे विद्यार्थी फटाक्यांच्या माध्यमातून एकमेकांना आपली ताकद दाखवत आहेत. ही मुलं फटाके फोडून एकमेकांच्या हॉस्टेलमध्ये फेकताना दिसून येत आहेत. काही विद्यार्थी सतत एकमेकांवर रॉकेट मारत आहेत. अनेकवेळा या फटाक्यांमुळे होस्टेलच्या खोल्यांमध्ये आगही लागते.
हे युद्ध केवळ एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी ही मुलं लहान-सहन फटाके नाही तर दर्जेदार भलेमोठे ज्वलंत फटाके एकमेकांवर फेकत आहेत. असे करणे एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकते त्यामुळे असे जीवघेणे प्रयोग कधीही करू नयेत. व्हिडिओतील दृश्ये पाहून युजर्स मात्र आता फार अचंबित झाले आहेत.
Kalesh b/w Two groups of Hostel boys with Crackers during Diwali Celebration
pic.twitter.com/fuLsY8mg36— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 30, 2024
हेदेखील वाचा – तरुणीच्या गळ्याभोवती घातला सापाने विळखा, तरुणीने केलं असं पाहून तुमचाही उडेल थरकाप, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स एकूणतावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हॉस्टेलमधील दोन गटांनी फटाक्यांसह दिवाळी साजरी केली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मात्र देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे पाहायला मजेदार असले तरी तितकेच धोकादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.