‘मी अध्यक्षाचा मुलगा आहे’ म्हणत तरुण काढत होता तरुणीची छेड, घडली अशी अद्दल की... एकदा पहाच Viral Video
येत्या दिवसांत महिला अत्याचाराच्या अनेक नवनवीन घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे मात्र तरीही अशा प्रकरणांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एक तरुण भरस्त्यात तरुणीची छेड काढताना दिसून येत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ एका व्यक्तीने दुरूनच रेकॉर्ड केला आहे. यात व्हिडिओत एका सोसायटीचा परिसर दिसत आहे. मधून रास्ता आणि दोन्ही बाजूंनी बिल्डींग्स आहेत. म्हणजेच जाण्याचा केवळ एक लहान मार्ग. या रस्त्यावरून एक तरुणी आपली सायकल घेऊन पुढे जात असते. याचवेळी तिच्या मागे एक तरुण आपल्या बाइकवर तिचा पाठीपाठी जाण्याचा प्रयत्न करत असतो. तरुणी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिथून निसटण्याचा प्रयत्न करते मात्र तितक्यात हा तरुण आपली बाइक तिच्या पुढे नेऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करतो.
हेदेखील वाचा – बापरे! कोकिळेचे बाळ भल्यामोठ्या गिरगिटाला गिळू लागले, पाहून आईही थक्क, Viral Video पाहून हैराण व्हाल
यानंतर कॅमेरामॅन पुढे जाऊन त्याला याबाबत जाब विचारायला सुरुवात करतो. त्यानंतर कॅमेरामॅन त्या मुलीला विचारतो, “तु याला ओळखतेस का?” त्यावर मुलगी म्हणते, “नाही. मी यांना ओळखत नाही. खूप दिवसांपासून ते मला छेडत आहे.” त्यानंतर कॅमेरामॅन मुलीला विचारतो, तु कुठून आली?” ती सांगते, “मी अंगणवाडीतून येत आहे. मी अंगणवाडीत शिकवते.”
पुढे कॅमेरामॅन त्या तरुणाला विचारतो, “तु या मुलीला का त्रास देत आहे” तेव्हा मुलगा त्यावर बोलतो, तुला माहीत आहे का मी कोण आहे.” तेव्हा कॅमेरामॅन म्हणतो, “कोण आहे तू?” त्यावर मुलगा सांगतो, “मी अध्यक्षाचा मुलगा आहे.” त्यानंतर कॅमेरामॅन त्या मुलीला फोन पकडण्यास सांगतो आणि त्याच्या बाइकची चावी घेतो व त्याला म्हणतो, “जा. वडिलांना फोन कर मी चावी देणार नाही.” कॅमेरामॅन त्या मुलीला सुद्धा रागावतो आणि म्हणतो, “तुला कळत नाही का? हात पकडल्यानंतर ओरडून तु सांगू शकत नाही का?”
किस अध्यक्ष का बेटा है ?? निकालो ऐसे लोगों।को pic.twitter.com/hV9PCpyDne
— 🥀🌹N𝖆𝖓d𝖚 Nair 🌹🥀 (@nair_nandu08) October 3, 2024
हेदेखील वाचा – आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, धक्कादायक घटनेचा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @nair_nandu08 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा लोकांना इतके मारले पाहिजे की, ते पुन्हा कधीही आयुष्यात कोणत्याही मुलीचा मार्ग अडवणार नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ““व्हिडीओ पाहून खरंच बरे वाटले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” मला वाटते की हा शैक्षणिक उद्देशाने तयार केलेला स्क्रिटेड व्हिडिओ आहे.”