वाळवंटाचा जहाज रस्त्यावर उतरला, स्केटिंग शूज घालत मोठ्या तोऱ्यात उंटाने करून दाखवली स्केटिंग... मजेदार Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक असे दृश्य शेअर होतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल आणि आताही असेच काहीसे दृश्य इथे शेअर करण्यात आले आहे. इंटरनेटवर एका उंटांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओची खासियत म्हणजे अधिकतर वाळवंटात आढळून येणारा हा प्राणी चक्क शहरातल्या रस्त्यावर स्केटिंग करताना दिसून आला. आता उंटासारखा प्राणी स्केटिंग करणं कसं शक्य हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला यामागचं गुपित जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जाणारा उंट रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या जोडीला स्केटिंग शूज घालून स्केटिंग करताना दिसून आला. एका व्यक्तीने आपल्या कारच्या खिडकीतून हा व्हिडिओ शूट केला आहे. पण गोंधळून जाऊ नका, कारण हा व्हिडिओ एआयद्वारा बनवला गेलेला व्हिडिओ आहे. वास्तविक उंट शहरांमध्ये आढळणे जरा कठीण आहे आणि त्यातही स्केटिंग करणं तर आणखीनच अशक्य. उंटाला असं स्केटिंग करताना पाहून लोकांनी मात्र या व्हिडिओची चांगलीच मजा लुटली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर देखील केला जात आहे.
सब कुछ न कुछ नया कर रहे हैं फेमस होने के लिए 😊
ऊंट बोला में क्यों पीछे रहूं 😂
आप क्या सोचते हैं pic.twitter.com/78rYmHWIfN — Dashrath Dhangar (@DashrathDhange4) October 18, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @luxury नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वजण फेमस होण्यासाठी काही ना काही करत आहेत मग उंट बोलला असेल मी कशाला मागे राहू’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे घडू शकत नाही, हा एआयचा चमत्कार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाळवंटाचा जहाज आज चक्क रस्त्यावर आला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “उंटाने बरोबर निर्णय घेतला, तो तरी किती वेळ चालत राहील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.