
Scuba Diving Trainer Molested Woman Underwater Disturbing Video viral
राशा सांगते की, ती एक सोलो ट्रॅव्हलर आहे. तिने स्कूबा डायव्हिंग शिकण्यासाठी इजिप्तमध्ये एक क्लास लावला होता. यावेळी तिच्या ट्रेनरने तिच्यासोबत गैरकृत्य केले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, स्कूबा ट्रेनर राशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. राशा त्याच्यामुळे असवस्थ झाली होती. तिने त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. राशाने सांगितले की, ट्रेनरची नजर तिला पहिल्यापासूनच ठीक वाटत नव्हती. यामुळे तिने सतर्क राहून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तिने सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांना सावध राहण्याचा आणि अशा नराधमांना धड शिकवण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ राशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडर @roam.with.rasha वर शेअर केला आहे. या व्हिडिओवर सध्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. अनेक महिलांनी राशासोबत घडलेल्या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच संबंधित स्कूबा डायव्हिंग सेंटरविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला राशाला दिला आहे. सध्या याबाबत इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाल आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला त्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच सुरक्षित नाही का असा प्रश्न करत आहेत.
जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.