(फोटो सौजन्य: Instagram)
फुग्यांचा गुच्छ स्वतःला बांधून हवेत उडण्याची अनेकांची इच्छा असेल. ही इच्छा आपल्यासोबत घडून येणे मात्र फार कठीण आहे, कारण मानवाचे वजन फुग्यांना झेपण्याइतके नाही ज्यामुळे साध्या फुग्यांसह आपण तर उडू शकत नाही पण हीच गोष्ट लहान प्राण्यांसोबत घडून येऊ शकते. तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला हवेत उडताना पाहिले आहे का? लहान प्राणी आकरानेच नाही तर वजनानेही कमी असतात ज्यामुळे फुग्यांसह ते हवेत उडू शकतात. आता उंदरासारखा लहान प्राणी हवेत उडू शकतो का हे पाहण्यासाठी एक माणसाने एक अनोखा पराक्रम करू पाहिला, त्याने फुग्यांचा गुच्छ्याला उंदरासह बांधले त्यानंतर उंदीर अवकाशात उडू लागला. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने फुग्यांच्या गुच्छ्याची दोरी उंदराच्या शेपटीला बांधल्याचे दिसून येते. आपल्यासोबत काय घडत आहे याची काहीही माहिती नसलेला उंदीर यावेळी स्तब्ध होऊन हे सर्व पाहत असल्याचे दिसते. पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडते ज्याचा त्याने विचारही केला नसेल. व्यक्ती फुग्यांच्या गुच्छ्याची दोरी हवेत सोडताच फुग्यांसह उंदीरही हवेत उडत जातो जे पाहून सर्व थक्क होतात. आजूबाजूची काही लोक हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैदही करतात.
या सर्व प्रकाराच्या आता दोन बाजू निघतात एक म्हणजे ही घटना आपण मजेशीर आणि हसण्यावरी घेऊ शकतो, छोट्याशा उंदराला असे हवेत उडताना पाहून अनेकांनी या दृश्यांची मजा लुटली असेल पण याची दुसरी बाजू अशीही निघते की, त्याच्या आयुष्याशी मांडलेला खेळ. आपल्या शुल्लक आनंदासाठी मानव आधीपासून प्राण्यांचा वापर करत आला आहे आणि या व्हिडिओतही असेही काहीसे घडल्याचे दिसून आले. ज्याने जमिनीवरचे विश्व पूर्णपणे कधी पाहिले नाही अशा उंदराला असे हवेत उडवणे त्याला धक्का देणारे ठरू शकते. निश्चितच त्याला बांधण्यात आलेल्या त्या दोरखंडातून तो स्वतः स्वतःची सुटका करू शकत नाही आणि परिणामी या संपूर्ण दृश्यात उंदराचा जीव टांगणीला लागला एवढं नक्की…
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @funny_short_5g नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी व्हिडिओला मानवाची क्रूरता असल्याचे म्हटले आहे र काहींनी उंदराला असं हवेत उडताना पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.