
लग्नाची मेजवानी बनली रणभूमी! 'रसगुल्ल्या'वरून वऱ्हाडींमध्ये तुफान हाणामारी (Photo Credit- X)
Wedding in Bihar’s Bodh Gaya called off after bride & groom families fight over rasgulla shortage. Chairs thrown, punches exchanged; bride’s side later files dowry case. CCTV video viral. (Nov 29)
pic.twitter.com/G0x9iDDa55 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 4, 2025
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
बोधगया येथील एका हॉटेलमध्ये ३० नोव्हेंबर रोजी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवरीकडील लोक अतरी पोलीस ठाणे क्षेत्रातील, तर नवरदेवाकडील लोक बोधगया पोलीस ठाणे क्षेत्रातील हथियारा गावचे होते.
वाद नेमका कशावरून
वरमाळेचा कार्यक्रम झाल्यावर नवरदेवकडील मंडळी जेवण करण्यासाठी हॉलमध्ये पोहोचली. याच वेळी रसगुल्ला कमी पडल्याने दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. बघता बघता वादाचे रूपांतर मारामारीत झाले. लोक एकमेकांवर तुटून पडले, खुर्च्या आणि हातात जे येईल ते शस्त्र म्हणून वापरले जाऊ लागले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे अखेरीस विवाह सोहळा रद्द करण्यात आला.
वादाचे कारण काय?
या मारामारीत दोन्ही बाजूचे अनेक लोक जखमी झाले असून, दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या बाजूच्या लोकांनी आरोप केला आहे की, नवरदेवाच्या कुटुंबीयांनी आधी दिलेल्या १० लाख रुपयांच्या हुंड्यानंतरही अतिरिक्त २ लाख रुपयांची मागणी केली. त्यावरून वाद वाढला.
वराने फेटाळला आरोप
नवरदेव पक्षाने हा आरोप पूर्णपणे फेटाळला आहे. त्यांचा दावा आहे की, ते हुंडा न घेता लग्न करत होते आणि वाद केवळ जेवण (रसगुल्ला) कमी पडल्यामुळे सुरू झाला, जो नंतर वाढला. आम्ही आजही लग्नासाठी तयार आहोत, पण मुलीच्या पक्षाने खोटा गुन्हा दाखल करून माघार घेतली, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवले असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.