मस्ती बेतली असती जीवावर! दिवाळीचा बारासकट माणूसही फुटला; चुकून पेटली वात, फुटली हातातली माळ... Video Viral
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या सणात नवीन कपडे, फराळांची मेजवानी आणि फटाके यांची मजा काही औरच. फटाके फोडताना मजा फार येते पण ही मजा लुटत असताना आपल्या सुरक्षेची काळजी घेणं फार गरजेचं आहे, अन्यथा मोठा धोका उद्भवू शकतो. असाच काहीसा प्रकार आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तरुणाचे शरीर फटाक्यांच्या प्रकाशात जळता जळता राहिलं. आपला निष्काळजीपणा आपल्या जीवावर कसा बेतू शकतो, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, एका रस्त्यावर काही लोक दिवाळीची मजा लुटण्यासाठी फटाके घेऊन सज्ज आहेत. ते फटाक्यांची मजा लुटत असतातच पण तेवढ्यात अनर्थ घडून बसते. फटाका हवेत जाऊन फुटतो, ज्यानंतर त्यातील एक व्यक्ती रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी खरंतर त्याच्या बाजूला आणखीन एक फटाका पेटवलेला असतो, ज्यावर त्याच लक्ष जात नाही. व्यकती पुढे जाताच त्याच्या बाजूने जोरात फटाक्याचा विस्फोट होतो आणि त्याच्या आगीत व्यक्तीचा चेहरा अक्षरश: दिसेनासा होतो. व्यक्तीच काही बरंवाईट झालं असेल असा विचार करणार तितक्यातच तो त्या फटाक्याच्या विस्फोटातून बाहेर पडतो आणि आपला जीव वाचवतो.
व्हिडिओमध्ये व्यक्तीचा जीव सुखरुप वाचला असला तरी हा व्हिडिओ आपल्याला बरंच काही शिकवून जातो. दिवाळीत फटाक्यांची मजा लुटताना केलेली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते याचे उत्तम उदाहरण आपल्याला या घटनेत पाहायला मिळते. सण हा आनंद लुटण्याचा मार्ग आहे पण हा आनंद लुटताना आजूबाजूच्या परीस्थितीचा विसर पडायला नको.
सिंहिणीला छेडणं बिबट्याला पडलं महागात, जंगलाच्या राणीने थेट झाडावर चढून दाणादण हाणलं; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @aarshu_shukla_79 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हल्ला अचानक झाला होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ अरे बापरे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माणसाचा कोळसा होता होता राहिला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.