(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडियावर विविध व्हिडिओज व्हायरल होत असतानाच नुकताच इथे प्राण्यांसंबधित एक मजेदार आणि हास्यास्पद असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्राण्यांमध्ये शिकारीचे दृश्य फार सामान्य आहे. सध्या अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून तुम्हाला हसूच अनावर होईल. वास्तविक यात एका नदीत साप आणि त्याच्या समोर एक मासा पोहत असल्याचे दिसते पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा मासा आपल्या मारण्याचे नाटक सुरु करतो. पण खरा ट्विस्ट तेव्हा होतो जेव्हा सापाचे खारेपण बाहेर येते. सापाला वेडा बनवण्याचा प्रयत्न करणारा मासा शेवटी स्वतःच वेडा ठरतो पण व्हिडिओत नक्की काय घडतं ते आम्ही तुम्हाला सांगतो, चला जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका माशाची अभिनय प्रतिभा दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. खरं तर, नदीतील साप हा खोटा साप होता जो फक्त माशाला घाबरवण्यासाठी पाण्यात ठेवण्यात आला होता. पण सापाला पाहताच मासा इतका घाबरतो की त्याचे नाटकी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. मासा देखील नाटक करू शकतो हे लोकांना व्हिडिओतील दृश्ये पाहून समजले आणि मग सर्वत्र हास्याचा विस्फोट झाला. लोकांनी या दृश्याची मजा लुटली आणि व्हिडिओ वेगाने शेअर देखील केला.
this deserves an Oscar
pic.twitter.com/lgotTM0qor — Science girl (@gunsnrosesgirl3) October 14, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gunsnrosesgirl3 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा प्राणी “मृताचे नाटक करतात” तेव्हा त्याला टॉनिक इमोबिलिटी म्हणतात, एक प्रतिक्षेप, जो कृती करत नाही. मेंदू शरीरात तणावाच्या सिग्नलने भरून जातो ज्यामुळे अचानक स्नायू गोठतात, हृदय गती कमी होते आणि जवळजवळ परिपूर्णपणे मृत्यूची नक्कल होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रिय मासा त्या खूप चांगले नाटक केले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याच्या ॲक्टींग समोर तर ॲक्टर्स पण फेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.