(फोटो सौजन्य: X)
जंगलात काही बड्या शिकाऱ्यांचे राज्या चालते, ज्यात सिंह आणि बिबट्याचा प्रामुख्याने समावेश होतो. सिंह हा जंगलाचा राजा आहे तर सिंहीणही जंगलाची राणी मानली जाते. याच राणीला चेढण्याचा पराक्रम करुन बसला बिबट्या ज्यानंतर होणार काय… सिंहिणीने बिबट्याला अशी जन्माची अद्दल घडवली की पाहून सर्वांचेच होश उडाले. बिबट्याने आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला खरा पण सिंहीणीच्या रागाने त्याला तिथेही बुकलून काढलं. या मजेदार घटनेचे दृश्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. चला यात नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जंगलात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सिंहाला अनेक लढाया कराव्या लागतात. तथापि, तो बहुतेक लढाया जमिनीवर लढतो. पण यावेळी, काही कारणास्तव, त्याला बिबट्याला अद्दल घडवण्यासाठी शिकवण्यासाठी झाडावर चढण्यास भाग पडते. सुरुवातीला, सिंहीणीला झाडावर चढणे कठीण जाते, कारण बिबट्या सिंहांपेक्षा अधिक लवचिक, हलके आणि वेगवान असतात. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, सिंह केवळ झाडावर चढत नाही, तर बिबट्याशी लढण्याचा आणि शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसते. फांदीवर चढून ती बिबट्याला हाणते पण तितक्यात फांदी तुटते आणि सिंहीण, बिबट्या दोघेही झाडावरुन खाली पडतात. खाली पडताच बिबट्या संधीचा फायदा घेतो आणि सिंहीणीच्या तावडीतून आपली सुटका करतो. व्हिडिओतील दृश्ये आपल्याला जंगलातील वर्चस्वाची गाथा सांगतात. वेगवान आणि बलवान असला तरी जंगलाच्या राणीसमोर बिबट्याला कमकुवत ठरतो.
That leopard bounced off the floor like a ping pong ball 😂 pic.twitter.com/qa53zp7uvP — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) October 15, 2025
दरम्यान सिंहीण-बिबट्यामधील हा रंजक संघर्ष @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘त्या बिबट्याने पिंग पॉंग बॉलसारखा जमिनीवरून उडी मारली’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की त्याला दुखापत झाली नसेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिबट्याच्या बाबतीत घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे झाडावरून पडणे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती लँडींग अविश्वसनीय होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.