घोरपडीला पाहताच श्वानांच्या ग्रुपने चढवला हल्ला, चावून चावून असं केलं हैराण... बिचारीचं पळणंही नाही कठीण; Video Viral
प्राण्यांचे आयुष्य हे मानवाच्या आयुष्यातून बरेच वेगळे असते. इथे कोण कुणावर हल्ला करेल ते सांगता येत नाही. ज्याच्याकडे शक्ती तोच इथे जगू शकतो. जंगलातल्या अनेक लढाया आपण आजवर सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिल्या आहेत मात्र सध्या एक अनोखा आणि सर्वांना हादरवून टाकणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात एका घोरपडीवर कुत्र्यांच्या एका गटाने जोरदार हल्ला केल्याचे दिसून आले. भटक्या कुत्र्यांनी घोरपडीला पाहताच आपल्या तोंडाने तिला पकडायला सुरुवात केली आणि ती पळत हे पाहताच ते तिच्यावर आणखीन आक्रमक झाले. एकएकाने घोरपडीला अक्षरशः चावून चावून हैराण केलं आणि हे दृश्य आता इंटरनेटवर वेगाने शेअर केले जात आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, कुत्र्यांचा एक गट घोरपडीला मिळून त्रास देत आहेत. घोरपड तिच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करते, पण कुत्रे तिला जाऊ देत नाहीत. घोरपड पळतच त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते पण कुत्रे तिचे वाट अडवत तिला आपल्या तोंडाने पकडू लागतात. एक एकजण घोरपडीला आपल्या तोंडात पकडून साठवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत तिची काय या हल्लयातून सुटका होत नाही. ईमानदार मानले जाणारे कुत्रे इतके धोकादायक देखील असू शकतात हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ राजस्थानमधील द्वारिकापुरा येथील असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान श्वानांच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ @maheshchandverma9166 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यातील काळा कुत्रा जरा जास्तीच उड्या मारत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुक्या प्राण्याला का मारत आहे भावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ बनवणाऱ्याने हे थांबवायला हवे होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.