
Wedding Haldi Bride beats Groom in Push-up Challenge video viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लग्नाचा मंडप दिसत आहे. नवरा-नवरीसह पाहुण्यांनी पिवळ्या रंगाचे ड्रेस घातले आहेत. यावरुन हळीदाचा कार्यक्रम सुरु असल्याचे लक्षात येते. दरम्यान यामध्ये सर्वजण आनंदात गेम्स खेळत आहे. याच वेळी नवरा-नवरीला एक अनोखे चॅलेंज दिले जाते. दोघांना पुश-अप्स मारायला सांगितले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे नवरी नवरदेवापेक्षा एक पुशअप्स जास्त मारते. नवरदेव ३० व्या पुशअप्सलाच खाली पडतो, पण नवरीची एनर्जी अजून असते. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्… घटनेचा Video Viral
इस पापी को कभी माफ नहीं किया जाएगा 😭 इसने मर्द समाज की इज्जत मिट्टी में मिला दी है ✊ pic.twitter.com/61dF8trjbw — MLA (@MLA_jnm5050) January 29, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MLA_jnm5050 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर नवरीचे कौतुक केले आहे. धाकड छोरी, जबरदस्त फिटनेस, असे लोकांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने या नवरीने तर पुरुषाला त्याची जागा दाखवून दिले असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने इज्जत घालवली पोरानं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.