महिलेने एकाचवेळी पाच चपात्या बनवायची सांगितली 'निन्जा टेक्निक'; पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सागंता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही तर बऱ्याच वेळा असेही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तुम्ही किचन टीप्स चे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कमीत कमी वेळात स्वयंपाक कसा बनवायचा याचे अनेक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
एका महिलेने एकचवेळी पाच चपात्या बनवायची एक ट्रीक सांगितली आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अनेक गृहीणींच्या पसंतीस पडत आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया यावर दिल्या आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रामाणावर इतर सोशल मीडिया प्लॅटफर्मवर देखील शेअर करण्यात आला आहे.
एकाचवेळी पाच चपात्या बनवायची निन्जा टेक्निक
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला स्वयंपाकघरात रोटी बनवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. प्रथम ती पिठाचे अनेक गोळे बनवते. यानंतर, ती त्यावर फॉइल आणि पीठाचा गोळा ठेवते. अशाप्रकारे, ती हे अनेक थरांसाठी करते आणि नंतर वरच्या बाजूला चकला ठेवून त्यावर प्रेस करते. अशाप्रकारे स्त्री एका वेळी चपात्या न लाटून घेता अनेक गाल रोट्या तयार करते. नंतर महिला त्यांना तव्यावर एक एक करून शेकून घेते. महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- धक्कादायक! त्याने पुलावरून उडी मारली अन्… होत्याचं नव्हतं झालं
व्हायरल व्हिडीओ
ये तो रोटियां बनाने में @ocjain4 जी ने कमाल ही कर दिया । pic.twitter.com/DE9wZC0rJV
— राय साहब पटना वाले (@Patnasehainji) September 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Patnasehainji या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 3 लाख लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अप्रतिम, वेलणाशिवाय एकाच वेळी इतक्या रोट्या वा, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ही टेक्निक भारताबाहेर जाता कामा नये, तसेच आणखी एका युजरने लिहिले आहे की, तिने एकमद परेफ्कट गोल रोट्या केल्या आहेत.