फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही ना काही धक्कादायक पाहायला मिळते. सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत फेमस होण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी लोक काही ही करायला तयार असतात. विशेषत: तरूण मंडळी या सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेली आहे की, त्यांना आपण काय करत आहोत याचे देकील भान नसते. जीवावर बेततील असे स्टंट ते करतात. असे व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात की, आयुष्य एवढं स्वस्त आहे का?
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, तरूणाने एक धोकादायक स्टंट केला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने आपला जीव धोक्यात घालून पुलावरून उडी मारून विजेच्या खांबावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र असा स्टंट करणे त्याच्या जीवावर बेतले आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण रहदारीच्या पुलावर उभा आहे. तो पुलावरून समोर असलेल्या खांबवर उडी मारण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पण उडी मारल्यानंतर त्याच्या हातातून खांब निसटतो आणि तो जोरात खाली कोसळतो. ज्या उंचीवरून तो पडलेला दिसत आहे ते कोणासाठीही जीवघेणा ठरू शकतो. व्हिडीओवरून लक्षात येते की, कदाचित तरुणचा जीव गेला असेल किंवा गंभीर जखमी झाला असावा, कारण इतक्या उंचीवरून पडल्याने दुखापत होणे साहजिक आहे. हा व्हिडीओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. तसेच त्या तरूणा बद्दल देखील कुठलीही माहिती नाही.
हे देखील वाचा – मुंबई पोलिसांची गणपती बाप्पाला मानवंदना; व्हिडीओ पाहून तुमचाही उर भरून येईल
व्हायरल व्हिडीओ
— Crazy Clips (@crazyclipsonly) September 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा स्टंट तरूणासाठी धोकादायक तर ठरलाच पण अशा धोकादायक स्टंट्सपासून लोकांना सावधही केले. लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि तो पाहिल्यानंतर घाबरले आहेत. तर काही लोक या तरुणावर त्याच्या मूर्खपणाबद्दल टीका करत आहेत, तर काहीजण याकडे चुकीचा सल्ला देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘हा मुद्दा एका गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकतो. सोशल मीडियावर ‘लाइक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यापासून मागे हटत नाहीत.’