माकड सायकल चालवताना
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहाययला मिळतात. सोशल मीडियावर फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायल मिळतात. तुम्ही अनेकदा माकडांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील.
सध्या असाच एक माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरू आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकजणांनी व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
सायकल चालवताना दिसलं माकड
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड सायकल चालवताना दिसत आहे. माकड जोरात सायकल चालवत असून असे वाटत आहे की, त्याच्या सोबत कोणीतरी सायकल रेस लावली आहे किंवा त्याच्या मागे कोणी तरी लागले आहे. सायकल चालवताना माकड मागे वळून पाहात आहे. तसेच तो मध्येच सायकलवरून उतरून सायकल पायी घेऊन जाताना देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण आवाक् झाले आहेत.
हे देखील वाचा – जीवघेणा स्टंट! तरुणाने टेकडीवर लटकत केला योगा; व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sonu6082 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘चला कोणाला रेस करायची आहे, या.’ व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘अरे भाऊ, तो भारी ड्रायव्हर आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे – हा एक रेसिंग गेम आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, उत्कृष्ट शर्यत दिसते. मी पण येतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.