फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आस्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर अनेकदा धोकादायक स्टंटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट करणारे लोक आपला जीव धोक्यात गालतात. सोशल मीडियावर फेमस होण्यसाठी लोक कोणताच विचार करत नाहत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरूणाने अशी ठिकाणी योगा केला आहे की, ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही आत्तापर्यंत लोकांना गार्डनमध्ये, किंवा एखाद्या मैदानावर, घरी, योगा करताना पाहिले असेल. पण या तरूमाने टेकडीवर लटकून योगा केला आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण एका डोंगराच्या काठावर लटकलेला आहे. तो त्या टेकडीला लटकून योगा करताना दिसत आहे. खाली खोल दरी दिसत आहे. तरूण ज्याप्रमाणे लटकलेला दिसत आहे असे वाटते की त्याचा हात घसरला तर तो क्षणात खाली पडेल आणि त्याचा जीव जाईल. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.
व्हायरल व्हिडिओ
व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले
हा व्हिडिओ सोशल मीडिय प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 2.777.baba या अकाुंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेर केला जात आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, फॉलोवर्स वाढवण्यासाठी आजकाल लोक काय करतील याचा ठाव नाही, तर दुसऱ्या एका युजरने म्हटेल आहे की, या अशा स्टंट करणाऱ्यांमुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पाहताना माझ्या अंगाव काटा आला होता.