भररस्त्यात भिकारी करू लागला आपल्या प्रेयसीसोबत रोमान्स, पाहून युजर्स म्हणाले, "हा तर गरिबांचा इम्रान हाश्मी"; Video Viral
प्रेम गरिबी किंवा श्रीमंती पाहत नाही. असं म्हणतात, प्रेम कधीही आणि कुणावरही होऊ शकत. प्रत्येकवेळी प्रेम हे महलात राहणाऱ्या राजासोबतच होईल हे गरजेचं नाही. काही वेळी ते गरीब व्यक्तीवरही होऊ शकत. श्रीमंती-गरिबीच्या पल्याड केलेले प्रेम चालू रस्त्यावर दिसून आले आणि आता याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका गरीब जोडप्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात ते रस्त्याच्या कडेला रोमान्स करताना दिसून आले. त्यांच्या कपड्यांवरून ते रस्त्यावरचे भिकारी असल्याचे समजत आहे मात्र त्यांची ही रोमँटिक शैली आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चला व्हिडिओत काय दिसले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसून येत आहे की, एक गरीब जोडपं रस्त्याच्या कडेला उभं आहे. यावेळी मुलाने त्याच्या प्रेयसीला आपल्या मिठीत घेतले आहे. तो तिच्याशी बोलत आहे, पण प्रेयसीकडे पाहून असे दिसते की ती त्याच्यावर रागवली असून तो तिला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर, तो प्रेयसीला स्वतःकडे वळवतो आणि तिला वारंवार काहीतरी पटवून देताना दिसून येतो. एका भिकाऱ्यालाही गर्लफ्रेंड आहे हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत तर काहीजण खिल्ली उडवत हा तर गरिबांचा इमरान हाश्मी आहे असे म्हणत आहेत.
Gareebo ka Emraan Hashmi😭😭😭 pic.twitter.com/yi92SJO9Uz
— Aniket Tiwari (@itztheani) June 24, 2025
पुण्यातील Influencer चा संतापजनक प्रकार; थेट लघवी लावली डोळ्यांना, नेटकऱ्यांचा चढला पारा
व्हिडिओतील दृश्ये आश्चर्यचकित करणारी असली तरी लोकांनी या व्हिडिओची चांगलीच मजा लुटल्याची दिसून येत आहे. व्हिडिओ मोठ्या वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ @itztheani नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सोबत भीक मागायला मनवत असेल ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे त्याच्याकडे पण गर्लफ्रेंड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, ही तर लेटेस्ट न्यूज आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.