पुण्यातील Influencer चा संतापजनक प्रकार; थेट लघवी लावली डोळ्यांना, नेटकऱ्यांचा चढला पारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून मन भरत नाही, तर काही इतके विचित्र स्टंट लोक करताता की त्यावर हसावे का रडावे कळत नाही. याशिवाय तुम्ही अनेक इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ पाहिले असतील. कोणी स्वयंपाकाच्या टिप्स, कोणी फशन टिप्स, तर स्कीन केअर टिप्स अशा भन्नाट भन्नाट आयडिया देत असतेता. सोशल मीडियासाठी रोज लाखो लोक वेगवेगळा कंटेट क्रिएट करत असतात.
सध्या पुण्यातील एका महिला इन्फ्लुएन्सराचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेने डोळे धुण्यासाठी धोकादायक आणि घाणरेडे कृत्य केले आहे. यामुळे सध्या महिलेला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. व्हिडिओमध्ये महिला डोळे धुण्यासाठी युरिनचा वापर करत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर एका युकृत तज्ज्ञांने देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर पिट्टी या महिलेने तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअक केला होता. ज्यामध्ये तिने डोळे धुण्यासाठी युरिन वापरण्याचे सांगतिले होते. याचे फायदेही तिने सांगतिले होते. तिने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लघवीने डोळे धुणे – निसर्गाचे औषध असे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पिट्टीने डोळे धुण्यासाठी लघवीचा वापर केल्याचे दाखवले आहे. यामुळे डोळ्याचा कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा कमी होतो असे तिने म्हटले आहे. याला नुपूर पिट्टीने नैसर्गिक आणि पर्यायी उपचार म्हटले आहे. सध्या तिचा हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत हे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Please don’t put your urine inside your eyes. Urine is not sterile.
Boomer aunties trying to be cool on Instagram is depressing…and terrifying.
Source: https://t.co/SQ5cmpSOfY pic.twitter.com/qgryL9YHfI
— TheLiverDoc (@theliverdr) June 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र टीका केली आहे. अनेकांनी तिला डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय एक यकृततज्ज्ञ डॉ. सिरियात ॲबी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी याला मुर्खपणा म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कृपया तुमचे लघी तुमच्या डोळ्यांत टाकू नका. लघवी निर्जंतुक नसते.” काकूंचा इन्स्टाग्रामवर कुल राहण्याचा भयानक आणि निराशाजनक प्रयत्न असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय अनेकांनी सोशल मीडियावरील आरोग्य संबंधी कोणतीही गोष्ट ट्राय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.